दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील पाथरूड येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 298 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच विजया शिवाजी तिकटे यांच्या हस्ते संपन्न झाले.तसेच राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त गटप्रवर्तक मनीषाताई वारे व सुनिता तिकटे आदींचा सत्कार शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरवले गेले आहे. प्रजेची उन्नती व विकास साधताना सामाजिक शांतता, समता, न्याय, स्वातंत्र्य या मुलभूत मानवी मूल्यांना अहिल्यादेवींनी आपल्या प्रशासन व्यवस्थेत प्राधान्य दिले आणि जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले.
प्रजेच्या कल्याणासाठी अविरत धडपड करणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी गावाकऱ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,उपसरपंच तानाजी बोराडे,शिवाजीराव तिकटे,अशोक भसाड,सेवक टिकटे,बाप्पा पवार,धोंडिबा टिळक,शमीनाबानू तांबोळी,सिद्धी बोराडे,अश्विनी आठवले,चंद्रकला फाळके,शोभा टिकटे,ग्राम विस्तार अधिकारी भागवत राठोड,कर्मचारी अशोक बोराडे,विलास जाधव,नागेश पवार,योगेश बोराटे यांच्यासह इतर नागरिक महिला भगिनी आदी उपस्थित होते.