दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेना ,भाजप रिपाइं, महायुतीने आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व मा.आ सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून
यामध्ये शिवसेनेचे सभापती निलेश शेळवणे, उपसभापती जयसिंग गोफने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घराणेशाही न पाहता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीच्या गळ्यात सभापती पदाची माळ टाकल्याने कार्यकर्ते आनंदात आहेत.ना.प्रा. डॉ तानाजीराव सावंत युवा मंच महाराष्ट्र राज्य च्या वतीने नूतन सभपती निलेश शेळवणे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच संचालक विशाल ढगे,अप्पासाहेब हाके यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंचचे अध्यक्ष तथा युवासेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे, सभापती निलेश शेळवणे,संचालक विशाल ढगे, अप्पासाहेब हाके,पांडुरंग धस, प्रशांत नाईकवाडी, सुभाष देवकते,दत्ता काळे,भरत सुरवसे,विकास बाबर, शेळवणे आदी युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.