दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी”,उद्योजकता विकास व प्रशिक्षण शिबीर या कार्यक्रमांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांचे शहरात आगमन होताच मा.नगराध्यक्ष संजय नाना गाढवे व उद्योजक किरण गाढवे यांनी स्वागत केले.यावेळी मा.उप नगराध्यक्ष तोफिक भाई कुरेशी,मा.नगरसेवक धनंजय मस्कर,उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय मोहिते, शिवाजी भडके,बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर ,तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ,,शहर प्रमुख संजय पवार,युवा सेनेचे प्रभाकर शेंडगे,सुरज गाढवे,विकास बाबर,शहाजी साबळे,लालू पवार,राम बागडे,दत्ता काळे यांच्यासह शिवसेनेचे शहरासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रशासनाचे सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.