
दैनिक चालू वार्ता
रायगडप्रतिनिधी प्रा अंगद कांबळे
म्हसळा – २९ नोव्हेंबर २०२१ वार रविवार रोजी दुपारी १२ वाजता प्राध्यापक मा श्री शिरिष समेळ सर यांच्या अध्यक्षतेखालील साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट आणि शिक्षक भारती संघटना रायगड शाखा म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सन २०२१ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित प्रा श्री. शिरिष समेळ, जेष्ठ समाजसेवक शंकर बेटकर, माजी सैनिक दिलीप वाघे शिक्षण प्रेमी रविंद्र येलवे,सै नवाज नजिर,प्रभाकर बोले, शाहिर भिमराव सुर्यतळ, शिक्षक भारती जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील, महिला अध्यक्षा कल्याणी वाजे, कार्याध्यक्ष कृष्णा पाटील, उपाध्यक्ष अमित महागावकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य विठोबा रेणोसे, तालुका अध्यक्ष रमेश सुभेदार मुरूड, राजु पार्टे पोलादपूर, सचिन गंगावणे माणगाव, राहुल नाईक, म्हसळा , शिक्षक भारती शिलेदार दिलीप शिंदे, दर्शना पवार , जयसिंग बेटकर, कोळवट डाक विभाग रूतीका काकडे, सिद्धांत शिंदे, उपसरपंच रविंद्र कुवारे, गाव अध्यक्ष प्रविण ठोंबरे, लक्ष्मण मोहिते, गाव प्रतिनिधी विनोद जोशी, नरेश मोहिते , सत्तार नजिर, महिला अध्यक्षा राजेश्री बेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पुजन आणि दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
उपस्थित मान्यवर यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
वाचनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील ३० गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष करून एमपीएससी स्पर्धापरिक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मा आ.श्री कपील पाटील साहेब यांनी राबविण्यासाठी दिलेला वाचनालया सारखे उत्तम उपक्रम म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात भापट या गावी साने गुरुजी बालभवन वाचनालय उत्तम प्रकारे सुरू आहे. आणि या वाचनालयाचा उपभोग या भागातील गोरगरीब विद्यार्थी, पालक, महिला, युवक घेत आहे . रायगड जिल्ह्यातील एक नंबर चे वाचनालय सुरू केले आहे. असे रायगड जिल्हा शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिपक पाटील सर यांनी मनोगतात सांगितले.
आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनारख्या महामारीतून बाहेर पडत असताना आता कुठे शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी शाळेत येत आहेत. शैक्षणिक खंड पडल्याने वाचन क्षमतेत विद्यार्थी मागे पडता दिसत आहे अशा वेळी वाचनालयाचा अधिकाधिक उपयोग घेऊन वाचनक्षमता वाढवली पाहिजे. वाचनालय साठी भविष्यात कधीही सहकार्य लागल्यास आपण नक्कीच सहकार्य करू असे समेळ सर यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
यावेळी महिला अध्यक्षा कल्याणी वाजे मॅडम, सचिन गंगावणे सर, रेणोसे सर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग बेटकर सर यांनी केले, स्वागत दिलीप शिंदे, सिध्दांत शिंदे, यांनी केले, सुत्रसंचलन राहुल नाईक यांनी केले आणि आभार प्रदर्शन अमित महागावकर यांनी केले.