दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी……
७२० पैकी ६७० गुण प्राप्त करीत कॉलेजमध्ये पटकावला प्रथम क्रमांक
————————————————
देगलुर: तालुक्यातील वझरगा येथील रहिवासी जुनिअर कॉलेज शिवाजी जुनिअर कॉलेज मुक्रामाबाद विद्यार्थी व देगलुर तालुक्यातील वझरगा येथील रहिवासी सारंग भारत कोकणे याने मे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट” च्या परीक्षेत ७२० पैकी ६७० गुण प्राप्त करीत उज्वल यश संपादित करुन कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सारंग भारत कोकणे यांचे माध्यमिक शिक्षण केंब्रिज विद्यालय नांदेड येथे झाले असून त्याने दहावी मध्ये ९०% तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८१% गुण मिळवून कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता. याकरिता त्याला प्राचार्य व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
वझरगा गावातील विद्यार्थ्यांने कोरोनाच्या संकटाच्या काळातही प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑनलाईन व ऑफलाईन तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे त्याने कोठेही खाजगी शिकवणी लावली नव्हती. येथील नायगाव तालुक्याती चारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक भारत रघुनाथ कोकणे यांचा मुलगा .
या यशाबद्दल त्याचे अभिनंदन वझरगा येथील ग्राम पंचायतचे सरपंच,उपसरपंच, सचिव, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी कौतुक केले आहे.
————————————————
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी “नीट” च्या परीक्षेला न घाबरता किंवा त्याचा अधिक बाऊ न करता सातत्यपूर्ण अभ्यास व सराव परीक्षांच्या माध्यमातून आत्मविश्वास पूर्वक तयारी केली तर हमखास यश प्राप्त करता येते. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की, या परीक्षेत इंग्रजी माध्यमाचे किंवा सीबीएससी बोर्डाचेच विद्यार्थी यशस्वी होतात परंतु, असे काही नाही.
मी स्वतः बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात शिकून हे यश प्रयत्नपूर्वक आणि कॉलेजमधील शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर संपादित केले आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर, कौटुंबिक जिव्हाळा, सण-समारंभ, मित्रमंडळी सोबत नाहक हिंडणे-फिरणे आदी बाबींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सोहम तळेकर याने दिली आहे