
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी पालकमंत्री माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील तसेच मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ व मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी मंत्री आमदार डॉ. विनय कोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. बारा तालुक्यातील विकास संस्था गटातून बारा तर इतर गटातून नऊ जागा निवडून द्याव्या लागतात. पन्हाळा विकास संस्था गटातून बँकेचे विद्यमान संचालक आमदार डॉ. विनय कोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच विद्यमान संचालक मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर हे सेवा सोसायटी मधून समर्थक मतदारांसह फॉर्म भरण्यास रवाना झाले . याआधी जयसिंगपूर येथील फार्म हाऊसवर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सेवा सोसायटीतील 100 हून अधिक मतदार उपस्थित होते . मंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज अर्ज दाखल केला . मंत्री हसन मुश्रीफांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा बँकेसाठी गगनबावडा सेवा सोसायटी मतदारसंघातून शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी 66 पैकी 49 सभासद फेटा बांधून अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत होते . यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री यांनी सांगित