दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी उमरगा तुळजापूर -शिवराज पाटील
उमरगा/तुळजापूर:-महात्मा गांधी विद्यालय केसरजवळगा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टाईम्स नाऊ चे पत्रकार रोहित पाटील तर अध्यक्ष म्हणून भुरे एस. के. होते. या कार्यक्रमात सर्व पाचवी ते दहावी पर्यंतच्या प्रथम क्रमांक पटकावलेल्या सर्व विद्यार्थ्याचे शाल श्रीफळ, ट्रॉफी व रोख रक्कम देऊन रोहित पाटील मित्र मंडळाकडून सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभास संस्थेचे अध्यक्ष भुरे एस. के शाळेचे मुख्याध्यापक राजपूत रोहित मित्र मंडळाचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बणजगोळे सर व आभार भुरे सर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कुलकर्णी डी. एस. यांनी पुढाकार घेतले तर सुत्र संचलन भुरे सर व भोसले सर यांनी केले.