दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कळका येथील महिला शेतकरी गंगासागर गायकवाड ,संग्राम गायकवाड,गणेश गायकवाड सुरज गायकवाड यांना त्यांच्या शेतात जाऊन कळका येथील आरोपी विवेक गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड,शोभा गायकवाड यांनी गंगासागर,संग्राम सुरज गणेश यांना नऊ टाके पडेपर्यंत मारहाण केली आहे तसेच त्यांच्या शेतातील काटेरी फरळ कापसाच्या पिकावर टाकून पिकाचे नुकसान केले आहे.कापूस लावलेले शेतात चुका लावत असताना आमचा शेत शेजारी विवेक धोंडीबा गायकवाड हा आम्ही कापसाचे शेतात टाकलेल्या फरळ उचलून आमचे शेतात टाकत होता तेव्हा त्यास फरळ का टाकत आहात असे म्हणताच त्यांने तुम्ही आमच्या शेतात फरळ का टाकता असे म्हणत विवेक ,ज्ञानेश्वर , शोभाबाई हे आमच्या जवळ येऊन गंगासागर व तिचे पती आणि मुलांना गंभीर जखमी केले. शोभाबाईने केस धरून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली त्यामुळे गंगासागर हिच्या मानेवर मुक्का मार लागला असून तसेच मुलगा सुरज यास ज्ञानेश्वर यांने दाबून धरले व विवेकने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून दुखापत केली आहे तसेच त्यांचा दुसरा मुलगा गणेश यास विवेकने उजव्या हाताला व पती संग्राम यांचे डाव्या हाताचे कोपराजवळ चावलाआहे सदरची घटना आमच्या शेत शेजारी प्रभाकर मारुती व्यवहारे ,उत्तम मारुती व्यवहारे यांनी पाहून सोडवा सोडव केली आहे पोलीस स्टेशनला येऊन उपचार कामे सरकारी दवाखाना कंधार येथे जाऊन उपचार घेऊन तेथील डॉक्टरने गंगासागर व मुलगा सुरज यांना नांदेड येथे रेफर केल्याने सरकारी दवाखान्यात विष्णुपुरी नांदेड येथे जाऊन उपचार घेऊन आज रोजी पोलीस स्टेशन कंधार येथे येऊन तक्रार दिली आहे तरी महिला शेतकरी व तिचे पती मुलाबाळांना मारहाण करणारे वरील चौघां विरुद्ध कारवाई करावी असा जवाब गंगासागर गायकवाड यांनी नोंदविला असून आरोपी विरूद्ध ३२४, ३२३,५०४,५०६,३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास राम पडवळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पेठवडज बिटचे जमादार करीत आहेत.