
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
श्रीरामपूर : आपण खरं बोलतो, म्हणून लोकांचा त्रास सहन करावा लागतो. आपल्या ओरड्याने चुकीच्या मार्गाने चाललेला समाज खडबडून जागा होत असेल तर ओरडण्यास काय हरकत आहे.
परिसरातील साखर कारखान्यांनी 2200 रुपये भाव जाहीर केल्यावर टिव्हीवर दिवसभर बातमीचे स्टिकर चालते. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तीन हजार १५० भाव जाहीर करूनदेखील कुठेही ऊहापोह होत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वास्तव कुणीही खरेपणाने मांडत नसल्याची खंत समाजप्रबोधनकार निवृती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांनी व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अनिल औताडे यांनी तालुक्यातील माळेवाडी येथे आयोजित केलेल्या कीर्तनात इंदोरीकर महाराज बोलत होते.
इंदोरीकर महाराज स्पष्टवक्ते असून समाजाचे वास्तव समोर मांडतात. त्यामुळे त्यांच्या खऱ्या बोलण्यावर काहींनी आक्षेप घेतले. परंतु आम्ही त्यांच्या विचारांसोबत असल्याचे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी सांगितले. शेतकरी संघटनेच्या वतीने १२ डिसेंबर रोजी बाबू गेणू व शरद जोशी यांचा स्मृतीदिन साजरा केला जाणार असल्याने इंदोरीकर महाराज यांना कार्यक्रमाचे रघुनाथदादा यांच्या हस्ते निमंत्रण दिले.