दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
छ. संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
औरंगजेबावरुन वाद निर्माण करणाऱ्यांनी आधी स्वत:चचे चारित्र्य बघावे. तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात कामाला होतात की नाही, तिकडे नोकऱ्या करायचात की नाही, हे सांगावे. आम्ही तर दरबारात साधे चोपदारही नव्हतो. त्यामुळे लोकांना शहाणपणा शिकवताना प्रथम आपला इतिहास तपासावा, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन वाद निर्माण करणाऱ्यांना फटकारले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन भाजपने शिवसेनेवर निशाणाही साधलाय. कारण प्रकाश आंबेडकर हे सध्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर आहेत. आता यावर काय प्रतिक्रिया उमटते ते पाहावं लागेल..आम्ही जे शिबीर घेतलं आहे महाराष्ट्रभरातून सर्व कार्यकर्ते इथे आलेले आहेत. एकाच ठिकाणी आम्ही सोय करू शकत नव्हतो, ट्रस्टीशी बोललो होतो काही जणांची या ठिकाणी राहण्याची सोय करा, असं आम्ही म्हटलं. त्यांनी ते मान्य केलं म्हणून ट्रस्टीला भेट देण्यासाठी काल आलो होतो. भद्रा मारुती मंदिराचे नवीन बांधकाम बघत मंदिराला भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा आहे.