
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
इस्लामपूर : बँक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी पेठ ( ता. वाळवा ) येथे ते बोलत होते. भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने पडण्याची भीती न बाळगता निवडणूक लढवली पाहिजे. कधी काळी पक्षाची अवस्था बिकट होतीत्यावेळी विरोधकांनी नारा केला होता” अरे अरे मुकुंदा पडशील कितींदा “. परंतु आज भारतीय जनता पार्टी पक्ष एक नंबरला पोहोचला आहे. सांगली जिल्ह्यात पक्ष मजबूत झाला आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. जिल्हा सह.
लोकल नेत्यांना राजकारणात महत्व द्या. जिल्हा बँक निवडणुकी सारखेच धोरण इतर आगामी येणाऱ्या निवडणुकीत ठेवा.
ते म्हणाले, “राजकरणात आपल्याला हवे तसे घडतेच असे नाही. उलट जे घडते ते फायद्याचे ठरते. पोटनिवडणुकीत आगामी काळात येणाऱ्या राज्यातील १०५ नगर पंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या आहेत. काही ठिकाणी आवश्यकता वाटल्यास जिल्हा अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षाशी बोलून निर्णय घ्यावा. त्याठिकाणी लोकल नेत्यांना राजकारणात महत्व द्यावे. जिल्हा बँक निवडणुकी सारखेच धोरण इतर आगामी येणाऱ्या निवडणुकीत ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. झालेल्या निवडणुकीत काय चुका झाल्या, कोणी फसवले हे लक्षात ठेऊन पुढील निवडणूक लढवायची आहे. आता तयार रहा.”
“शिवसेनेने आपल्या मुख्यमंत्री पदापायी आपला पक्ष संपवण्याचे ठरवले आहे. ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची सारखी अधूनमधून चेक करत आहेत ‘ ती मजबूत आहे का नाही.’ नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणच्या पोट निवडणुकित भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपचे – २३ , काँग्रेस -१७, राष्ट्रवादी कॉँग्रेस – १७, शिवसेना – १२ उमेदवार निवडून आले आहेत. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे.”
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक,सी. बी पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमित ओसवाल, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, विक्रम पाटील, चेतन शिंदे, जयराज पाटील उपस्थित होते.