
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
लोहा (ता प्र) येथुन जवळच असलेल्या मौ.कारेगाव येथे आज पोलिस संरक्षनात सरपंच सौ.सुमनबाई मधुकरराव मुलुकपाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रां.प.कार्यालयात ग्रामसभा संपन्न झाली.
या ग्रामसभेत गावाच्या विकासात्मक विषयावर गावक-यांनी चर्चा केली.व या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त समीती अध्यक्षांची निवड करण्याचा विषय ग्रामसेवक संदीप कच्छवे यांनी वाचुन दाखविला व महात्मा गांधी तंटामुक्त समीती अध्यक्ष पदासाठी आशोक एकनाथराव मोरे यांचे नाव बाबुराव मारोतराव मोरे यांनी सुचविल्यावरुन व सर्व गावक-यांनी अनुमोदन दील्यावरुन महात्मा गांधी तंटामुक्त समीतीच्या अध्यक्ष पदी आशोक एकनाथराव मोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी माजी सरपंच रामराव किरवले,उपसरपंच श्यामसुंदर किरवले,व्हाइस चेअरमन संभाजी किरवले,बाबुराव मोरे,पंजाब मोरे,गणेश मोरे,नरेंद्र किरवले,लक्ष्मण मोरे,आंबेडकर नॅशनल काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड,यांनी आशोक मोरे यांच्या निवडी बदल त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.