
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : “अधिवेशनादरम्यान किती गोंधळ झाला, किती तास वाया गेले हा मापदंड मानण्यापेक्षा किती काम झालं, सकारात्मक काम किती झालं हा असायला हवा. सरकार प्रत्येक विषयावर खुली चर्चा करण्यास तयार आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. मात्र हे प्रश्न शांतता राखून विचारायला हवेत. सरकारच्या धोरणांबाबत कितीही प्रखर विरोध असला तरी संसदेची प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे. संसदेत असं आरण असायला हवं की ते देशाच्या तरुण पिढीसाठी आदर्श ठरेल”.