
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा उत्तर प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
कंधार तालुक्यातील कुरुळा सर्कल मधील मौजे दिग्रस बुद्रुक येथील रहिवासी असलेले व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नविन कौठा नांदेड येथे कार्यरत असलेले प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांना नुकताच 2021 चा ए.जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन इचलकरंजी कोल्हापुर द्वारा *राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार 2021* ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती आणि दिनांक 28 नोव्हेंबर 2021 रविवार रोजी इचलकरंजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय गुणीजन सुवर्णमूर्ती या कार्यक्रमाचे आयोजन ए.जे. सोशल वेल्फेअर फौंडेशन इचलकरंजी कोल्हापूर च्या संस्थापिका तथा अध्यक्षा माननीय अबोली जिगजीनी यांनी आयोजित केले होते या राज्यस्तरीय गुणीजन सुवर्ण मोती पुरस्कार सोहळ्याचे तथा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहमदनगर पारनेर चे विद्यमान आमदार माननीय निलेशजी लंके साहेबयानी स्वीकारले होते तर विशेष अतिथी माननीय श्री चैतन्य महाराज वाडेकर ( युवा कीर्तनकार ) , माननीय श्री प्रमोद कुंडलीक पाटील( उद्योजक पी. पी .ज्वेलर्स ) , माननीय श्री बाबासाहेब पुजारी ( संस्थापक अध्यक्ष जानकी वृद्धाश्रम) , माननीय चाँदबाशा जीगजीनी ( शाखाप्रमुख मुस्लिम, OBC ऑर्गनायझेशन ) तर उद्घाटक माननीय सौ सीमा इंग्रोळे ( चेअरमन एस.डी.आर.फाउंडेशन ) , माननीय कु. शिवानी ताई देशमुख ( महिला युवती अध्यक्ष राजे प्रतिष्ठान) ही होते तर पुरस्कार वितरण सोहळा सिने अभिनेते , लेखक , चला हवा येऊ द्या फेम हास्य विनोदाचा बादशहा मा.श्री.सागरजी कारंडे यांच्या हातून संपन्न झाला.
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांनी ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून युट्युब या सोशल मीडियाचा वापर करून संपूर्ण महाराष्ट्रभर इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी covid-19 च्या काळात ऑनलाईन अध्यापनाची वर्ग चालवले आहेत या त्यांच्या शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक व राजकीय कार्यामध्ये सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासत covid-19 या काळात आठ महिने स्वस्त धान्य दुकानाचे राशन विना स्वार्थ , विनावेतन वाटप करण्याचे कार्य सुद्धा केले आहेत प्रा. यानभुरे यांच्या हाताखालून शिकून गेलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पदांवर नोकरीसुद्धा मिळालेली आहे तसेच विविध क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्यांना व गोरगरिबांना न्याय देण्यासाठी सुद्धा तळमळीने व जिद्दीने स्वतःला समाजकार्यात शैक्षणिक कार्य व राजकीय क्षेत्रात सुद्धा गुंतून ठेवले होते व स्वतःचे योगदान दिले आहे. शिक्षणाविषयी असलेली तळमळ व विद्यार्थी प्रती असलेला त्यांचा जिव्हाळा आणि यापूर्वी त्यांनी केलेल्या कार्यामुळे आत्तापर्यंत त्यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार , नांदेड जिल्हा पोलीस नागरिक समन्वय 2013 चा पुरस्कार तसेच गुरूंचा सन्मान 2018 हा पुरस्कार मिळाला असून 2021 मध्ये आणखीन एक या गौरव पूर्ण व सन्मानपूर्व पुरस्काराची भर पडली ते म्हणजे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार 2021 हा पुरस्कार होय या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यानी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून या पुरस्कारांमध्ये संस्थेचा खूप मोठा वाटा आहे त्यात संस्थाध्यक्ष मा. प्रा. डॉक्टर पुरुषोत्तम केशवराव धोंडगे साहेब तसेच संस्थेचे सचिव माननीय भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब , संस्थेचे सहसचिव एडवोकेट मुक्तेश्वर भाऊ केशवराव धोंडगे साहेब व शालेय समिती सदस्य प्रा. वैजनाथराव कुरुडे साहेब आणि शालेय समिती सदस्य माननीय सुर्यकांत कावळे सर , कॉलेजचे प्राचार्य भगवानराव पवळे सर , उपप्राचार्य परशुराम येसलवाड पर्यवेक्षक माधव ब्याळे आणि प्रा. मुरलीधर घोरबांड , प्रा. कान्हेगावर एस.पी . या मजा शैक्षणिक कार्यासाठी सदोदित इतिहास परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय प्रा.सुनीलजी शिंदे सर यांचे वारंवार मार्गदर्शन असून , माझे छोटे बंधू सतीश सोपानराव यानभुरे ( जिल्हा परिषद सहशिक्षक पुणे ) यां सर्वाचे मोठे योगदान आहे तसेच या सर्वांनी वेळोवेळी मला शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहित करून शिक्षण क्षेत्रात सतत गुंतवून राहण्यासाठी मार्गदर्शन केले आहे आणि यांच्या आशीर्वादासह माझ्या कुटुंबियांचे सहकार्य व आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे आणि विशेष बाब म्हणजे या पुरस्काराचे मानकरी जरी प्रा.जयवंत सोपानराव यानभुरे असले तरीही त्यांनी हा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार प्रा. विकास सोपानराव यांनभुरे यांना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वीकारण्यास भाग पाडले व आपल्या अंगी असलेला सद्गुण त्यांनी दाखवून दिला