
दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- युवा मित्र संस्था व बजाज यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या तीन वर्षांपासून जव्हार तालुक्यामध्ये आरोग्य मित्र हा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पा अंतर्गत जव्हार तालुक्यातील नांदगाव व साकुर या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या आपटळे,न्याहाळे,रायतळे, खडखड,केळघर,आणि नांदगाव ग्रामपंचायती मधिल जवळपास ३० पाड्यामध्ये कुपोषित मुले,गरोदर व स्तनदा माता यांच्या सोबत युवा मित्राच्या कार्यकारी संचालिका मनिषाताई पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुपोषण निर्मुलनासाठी काम सुरू आहे.याच अनुषंगाने आरोग्य मित्र प्रकल्पांतर्गत अशा आदिवासी पाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविले जात असून यामध्ये कोविड-१९ जनजागृती करणे,शोषखड्डे बनविणे,कुक्कुटपालन,परसबाग,आरोग्य जत्रा,आरोग्य मेळावा,किशोर वयीन मुलींना प्रशिक्षण,आरोग्य दिन जनजागृती,खाजगी रुग्णवाहिका पुरविणे,नेब्यूलायझर सेवा,आरोग्य समिती मार्फत आर्थिक सहाय्य करणे असे उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमा अंतर्गत २९ नोव्हेंबरला जवळजवळ ३० गावातील विविध पाड्यामध्ये जवळपास १०० कुपोषित मुलांना कावेरी जातीच्या प्रत्येकी ७ कोंबड्या व १ कोंबडा याप्रमाणे जवळपास ८०० कोंबड्यांचे वाटप करण्यात आले जेणेकरून त्या कुपोषित मुलांनी त्या कोंबड्या पासून मिळणारी अंडी खाऊन त्यांचे वजन वाढविले जाईल तसेच त्या घरातील गरोदर व स्तनदा माता यांना देखील फायदा व्हावा या हेतूने कोंबड्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा मित्र संस्थेचे सदस्य कृष्णा बाजारे,किरण गोरे,योगेश अभंग व आरोग्य सेविका तसेच आरोग्य समिती सदस्य व लाभार्थी उपस्थित होते.