
दैनिक चालू वार्ता
हदगाव तालुका प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
मातंग समाजावर अन्याय झाल्यास आम्ही गप्प राहणार नाही लहुजी टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष विमा शिरसाठ चिरंजीव रोहित शिरसाठ
——————————————–
लोणी खुर्द रिसोड जिल्हा वाशिम येथे मातंग समाजावर गावातील काही जातीवादी गावगुंडांनकडूण लहुजी साळवे यांच्या नावाचे बोर्ड का लावला म्हणून गावातील पोल वरील डि.पी वरुन लाईट बंद करून मातंग वस्तीत जाउन मातंग समाजांच्या पुरुष, महिला व अल्पवयीन मुलींना रॉड व कुर्हाडीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे हदगाव तालुकयातील
लहुजी टायगर फोर्स चे संस्थापक अध्यक्ष विमा शिरसाठ यांचे सुपुत्र रोहीत शिरसाठ यांनी नवयुवक उभारणी करुन लहुजी टायगर फोर्स च्या वतिने अशा जातीवादी लोकांचा जाहीर निषेध करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर संविधानाच्या माध्यमातून योग्य ये
ती कारवाई करावी अन्यथा लहुजी टायगर फोर्स च्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिनांक२७ नोव्हेंबर २०२१ रोजी पोलीस निरीक्षक यांना पोलीस स्टेशन तामसा तालुका हदगाव
येथे लहुजी टायगर फोर्स च्या माध्यमातून ननिवेद देण्यात आले. यावेळी लहुजी टायगर फोर्स सर्व कार्यकर्ते व मातंग समाजाचे नवयुवा कार्यकर्ते उपस्थित होते.