
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
श्री. रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा:-आर्णि तालुक्यातील मौजा दातोडी येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी भगवान आगिरकर यांची निवड करण्यात आली आहे, सर्वानुमते पालकांच्याउपस्थितीमध्ये ही सभा घेण्यात आली या सभेमध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली,दातोडी गावच्या पूर्वीच्या शाळा व्यवस्थापन समिती बदल करून फेरनिवड करण्यात आली, यावेळी काही नवीन पालकांना शाळा व्यवस्थापन समितीत सहभागी करण्यात आले, पूर्वीचे अध्यक्ष लक्ष्मण मुजमुले यांचा कार्यकाल संपल्यामुळे ही नवनिर्वाचित कार्यकारणी व अध्यक्ष निवड करण्यात आली,सर्व पालक वर्ग यांनी शाळेची ही जबाबदारी मला दिल्याबद्दल मी सर्व पालकांचा ऋणी आहे,पदाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले,