
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
दि. 29 मंठा नगरपंचायत निवडणूक जाहीर होताच मंठा तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी लोकांच्या भेटीगाठी वर भर दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांचाही बैठका घेणे सुरू आहेत. व भावी नगरसेवकांनी सुद्धा मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मंठा नगरपंचायत मध्ये शिवसेना हा सत्ताधारी पक्ष होता. शिवसेना हा पक्ष गड राखुन सत्ता मिळवणे मध्ये यशस्वी होतो का याकडे सर्व लोकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री ए.जे.पाटील बोराडे यांचा स्थानिक जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने यांनी ठामपणे सांगितले की येणाऱ्या काळामध्ये मंठा नगरपंचायत मध्ये शिवसेना हाच सत्ताधारी पक्ष असेल.
तर दुसरीकडे माजी मंत्री तथा आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांनी मंत्री कार्य काळामध्ये नगरपंचायतला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला होता. त्याचा फायदाही त्यांना होईल. व मोठ्या प्रमाणात असलेले कार्यकर्ते ही त्यांची जमेची बाजू आहे. या सर्व गोष्टीवरून त्यांनी विश्वासाने सांगितले की येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत मध्ये भाजप हाच सत्ताधारी पक्ष असेल.
तसेच आमदार श्री राजेशजी राठोड यांनीसुद्धा आमदार निधीतून मंठयाच्या विकासात आपला भर दिलेला आहे.व सामान्य जनतेचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवलेले आहेत. तसेच माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया यांचाही सामान्य जनतेशी मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क आहे. अनेक लोकांचे त्यांनी प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे लोक कामाची पावती म्हणून नक्कीच काँग्रेस पक्षाला बहुमत देतील असा विश्वास या दोघांनाही आहे. व काँग्रेस हाच सत्ताधारी पक्ष असेल असे त्यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या नगर पंचायत निवडणुकीमध्ये बहुमत मिळवेल
असा विश्वास तालुका अध्यक्ष बोराडे यांनी व्यक्त केला तसेच वंचित बहुजन आघाडी ही या नगरपंचायत निवडणुकीमध्ये बहुमत मिळवेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सय्यद रफिक यांनी व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसापासून ते वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. व एम. आय. एम. ही निवडणूक लढवणार असून त्यांनी ही असा विश्वास दिला की येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायत मध्ये एम. आय. एम. ची सत्ता असेल. या सर्व गोष्टीवरून सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असले तरी येणारा काळ व सामान्य जनताच ठरवेल नगरपंचायत मंठा मध्ये कोणाची सत्ता असेल.