
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
लोहरा तालुक्यातील विविध सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व ते कृतीतून दाखवत विविध विकास कामे स्वखर्चातून करून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे नेहमीच दाखवतात त्याचा प्रत्तय लोहारावासीयाना आला.
शहरातील प्रभाग क्रमांक12मध्ये
पठाण खडीवाले शेख व पोद्दार यांच्या घराजवळ खड्डा पडून गटारीतील तुंबलेले घाण पाणी सामाजिक कार्यकर्ते नितीन नारायणकर यांनी जेसीबी लावून स्वखर्चातून त्या पाण्याला वाट मोकळी करून दिली व तो खड्डा बुजवण्यात आला प्रभाग क्रमांक 12 मध्ये पठाण खडीवाले व शेख यांच्या घराजवळ पाणीपुरवठ्याचे मुख्य लाईन फुटल्याने पाईप लाईन दुरुस्ती साठी नगरपंचायत च्या वतीने मोठा खड्डा खोदण्यात आला होता गटारीचे वाहते पाणी अडविण्यात आल्यामुळे याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना होत होता गेल्या अनेक दिवसापासून नगरपंचायत या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे व पाईपलाईनचे काम झाल्यानंतर तो खड्डा बुजवण्याचे काम नगरपंचायत चे असताना देखील तो खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे सर्वच दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते तुंबलेल्या गटारी चे सांडपाणी वाहण्यासाठी स्वच्छता व रस्ता दुरुस्त केल्यामुळे नारायणकर कुटुंबा चे सर्वत्र कौतुक होत आहे