
दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
विहीगाव येथे मान्यवरांचा सत्कार व मल्लखांब खेळाडूंना बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
विहीगाव गावातील अग्नीशमन दलाच्या वतीने श्री विष्णू कवटे यांनी अत्युल स्पोर्ट्स अॅकडमी खेळाडूंना रु.१०हजार चेक देऊन गौरविण्यात आले.
तसेच शहापूर पंचायत समितीच्या सभापती सौ यशोदा आवटे यांचा सत्कार करण्यात आला, श्री प्रदीप वाघ मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी सामाजिक काम करत असणार्या लोकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी देखील अत्युल्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस व वीर राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट दिली.
तसेच मार्गदर्शन करताना अत्युल स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक व आदर्श शिक्षक श्री पवन आडोळे सरांचे आभार व कौतुक केले आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन मल्लखांब सारख्या खेळा बद्दल मुलांना आवड निर्माण करणे व राष्ट्रीय पातळीवर जाऊन खेळ करणे हि बाब फार मोठी आहे असे ते यावेळी म्हणाले.
श्री विष्णू कवटे यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम करून समाजा पुढे आदर्श निर्माण केला आहे, समाजातील कर्मचारी, नोकरदार वर्ग यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमा साठी श्री पवन आडोळे सर, श्री विठ्ठल गोडे, श्री चुनीलाल पवार सर,विहिगाव ,माळ,कसारा परीसरातील सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, जिल्हा परिषद शिक्षक वर्ग परीसरातील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.