
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- तालुका अध्यक्ष पदी श्री. विलास रामराव कळकेकर यांची न्यु.महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना तालूका कंधार अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. ते कळका ता. कंधार गावचे पोलीस पाटील असून त्यांना पोलीस प्रशासनाचा व राजकारणाचा चांगला परिचय असल्यामुळे त्यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. उपाध्यक्ष विश्वांवर मोरे पो.पा उस्माननगर, तालूका सचिव चंद्रकांत गोणारे पो.पा. पानशेवडी, सहसचिव पंढरी जोगपेटे पो.पा.नागलगांव,ता. कोषाध्यक्ष अशोक तेलंग पो.पा. चिंचोली, ता. कार्येध्यक्ष गंगाधर सांगवे पो. पा. बोरी (बु.),ता. महिला अध्यक्षा सावित्राबाई जोगपेटे, ता. उपाध्यक्षा पंचशिला गर्जे, ता. संघटक संग्राम गीते, ता. खजिनदार गोविंद शिंदे पो.पा. पेठवडज सदस्य पोलीस पा. कंधार, पोलीस पा. घोडज, पोलीस पा. हिप्परगा, पोलीस पा. वाखरड, पो.पा. आंबुलगा, पो.पा. नारनाळी, पो.पा.कल्लाळी, अशी नविन कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यात आली आहे असे भा.ज.पा. शक्तीकेंद्र पेठवडज अध्यक्ष श्री व्यंकट लक्ष्मणराव कळकेकर व सर्व गावकरी मंडळी कळका ता.कंधार यांनी कळविले आहे.