
दैनिक चालु वार्ता
*आत्मनिर्भर* व्यसनमुक्ती व् पुनर्वसन या संस्थेने या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग नोंदविला.
या संस्थेत उपचार घेत असलेले रुग्ण मित्र,कर्मचारी वर्ग व् संस्थेचे संस्थापक सुभाष बापू हगवणे मनसे नेते संतोष रिंडे यांनी परिश्रम घेतले.आत्मनिर्भर हि संस्था व्यसनमुक्ती सह रुग्ण मित्रांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करते. तसेच रुग्ण मित्रांचे पुनर्वसन करण्याचंही काम करते.
आत्मनिर्भर संस्थेने अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.ग्रामपंचायत महिला सेवक यांना मोफत साडी वाटप असो,होळी पौर्णिमेच्या दिवशी दारूची होळी कार्यक्रम असो,5 दिवसांचें मोफत निवासी व्यसनमुक्ती शिबीर असो अशा अनेक सामाजिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे.
आत्मनिर्भर संस्था गेल्या वर्ष भरा पासून किरकिटवाडी येथे व्यसनमुक्ती चे कार्य उत्तम रीतीने करत आहे.आज पर्यंत शेकडो रुग्ण मित्रांनी उपचार घेऊन ते आज सुंदर अशा जीवन शैलीने जीवन जगत आहे.