
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
भीम आर्मी नंदुरबार व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगून देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील घान व सांडपाणी ची विल्हेवाट न लावल्यामुळे अखेर 26 नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिनानिमित्त बहुजन समाज एकत्र जमल्यावर त्या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी तेथे आले असता त्यांना आम्ही परत विचारणा केली असता की दादा आज संविधान दिवस आहे आणि त्या संविधान दिनानिमित्त आम्ही एकत्र जमलो आहोत तर आतातरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील घाणीचे काही तरी करा हो असं सांगून देखील त्यांनी उलट आम्हाला मी तुमच्या बापाचा नोकर आहे का ?तर माझ्या पत्नीला मी निवडून आणण्यासाठी 23 लाख रुपये खर्च केले आहेत.दलीत वस्तीतील व तुमच्या भीमनगर मधील बहुजन समाजाने माझ्या पत्नीला एकही मतदान केले नाही. म्हणुन दलीत वस्तीतील एक ही काम यापुढे करणार नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. या कालावधीत मुलांना भेटून सांगतो की मी तुमचे आयुष्य मी बरबाद करून टाकेल. अशा कठोर शब्दात व दादागिरीच्या उग्र स्वरूपात त्यांनी धमकावण्याचा प्रकार कोपर्ली गावात घडला आहे. यामुळे आज दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी मा.जिल्हाधिकारी सौ यांना निवेदनाद्वारे ही बाब समजावली.हे निवेदन भीम आर्मी नंदुरबार व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दैनिक चालू वार्ता