पैठण प्रतिनिधी गजानन ठोके
मौजे कोळी बोडखा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोळी बोडखा ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री नितीन हातागळे उपाध्यक्ष अरुण अहिरे सचिव दीपक हातागळे गावातील ज्येष्ठ नागरिक नरेंद्र सुवर्णकार संपत पाटील चावरे सुरेश हातागळे यांच्या हस्तेपुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी उपस्थित तरुणांनी विश्वरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाज उद्धारासाठी कोण कोणते कार्य केले यांची माहिती उपस्थित त्यांना दिली लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अस्सल ग्रामीण कथा कादंबऱ्या पोवाडे कविता तत्कालीन राजकीय परिस्थिती यावर लेखन केले आपल्या लेखणीतून प्रहार करीत समाज उद्धारासाठी कार्य केले अण्णाभाऊंच्या विचारावर पुढे जाऊन आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे असे विचार गावातील तरुण मंडळींनी मांडले
या कार्यक्रमास लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन हातागळे उपाध्यक्ष अरुण अहिरे सचिव दीपक हातागळे नरेंद्र सुवर्णकार संपत पाटील चावरे दैनिक चालू वार्ताचे पत्रकार गजानन ठोके अजय अहिरे प्रमोद हातागळे रमेश हातागळे प्रभाकर हातागळे प्रकाश हातागळे राजू अहिरे अनिल अहिरे अरुण हातागळे मित्र हातागळे दिनकर मिस्त्री शेख एजाज आदींसह गावकरी उपस्थित होते…