दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे.
देगलूर: दिनांक 20 जुलै 2023 रोजी देगलूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याचे नुकसानाचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावे असे देगलूर शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना तालुका समन्वयक देगलूर भागवत पाटील सोमूरकर यांनी उपजिल्हा अधिकारी देगलूर व तहसील कार्यालय देगलूर येथे निवेदना मार्फत विनंती केली देगलूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी दुबार पेरणीमुळे संकटात सापडला असताना परत एकदा ढगफुटीमुळे देगलूर तालुक्यातील सुगाव, सावरगाव, वझरगा शहापूर मनसक्करगा वन्हाळी अंतापूर चैनपुर लख्खा या गावाचा तर संपर्कच तुटला असून, करडखेड, मरखेल हणेगाव, खानापुर, शहापूर, दावणगौर, लोणी, वझर शिळवणी सोमूर, बेमरा, मानूर खुतमापूर, रमतापूर, कुडली, कोकलगाव भुत्तनहिपरगा बिजलवाडी कुन्मारपल्ली, येडूर, अंबूलगा, मरतोळी, किनी, माळेगाव अशा अनेक गावातील शेतीतील पिकासहित माती खरडून गेली असून शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. परत या कष्टकरी शेतकऱ्यांना त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी शासनाने कसल्याच प्रकारची चौकशी न करता तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून देगलूर तालुक्यातील सर्व गावातील. शेतकऱ्यांना
तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावे.आसे युवासेना तालुका समन्वयक देगलूर भागवत पाटील सोमूरकर यांनी निवेदना मार्फत विनंती केली. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे देगलूर गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…