दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत असून प्रत्येक देशाने आपला संघही जाहीर केला आहे.या स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ फेव्हरेट असून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर सर्वांची नजर आहे. आयसीसीच्या आगामी टी-२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होत आहे.
बुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे, मात्र बुहराहहून घातक असलेल्या एका गोलंदाजाला वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाल्याने त्याने क्रिकेटलाच रामराम केला.
टी-२० वर्ल्डकपसाठी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली. या संघात यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याची निवड झाली नाही. यानंतर मलिंगा याने तात्काळ क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. मलिंगा टी-२० फॉर्मेटमधील खरतनाक गोलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये मलिंगाने १०७ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये मलिंगाच्याच नावावर सर्वाधिक १७० बळींची नोंद आहे. वर्ल्डकपच्या संघात मलिंगाची निवड न झाल्याने क्रीडाप्रेमी हैरान झाले होते. मलिंगानेही तात्काळ निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेच्या संघाला या सर्वोत्तम गोलंदाजाची कमी नक्कीच जाणवेल.