
2 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेची मासिक बैठक
दै चालू वार्ता
मुखेड ता प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
नांदेड दि. 30 –
शेतकरी संघटनेची मासिक बैठक गुरूवार, दि. 2 डिसेंबर रोजी नांदेडच्या नवा मोंढ्यातील जिल्हा कार्यालयात दुपारी 1 वाजता होणार असून अतिवृष्टीचे अनुदान, पीकविमा, मा. शरद जोशींची पुण्यतिथी, अर्धवट कर्जमाफी, शेतकर्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करीत असल्याबाबत, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामभाऊ नेवले यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम इ. विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली आहे.
गुरूवारी होणार्या या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. धोंडीबा पवार हे मार्गदर्शन करतील. या बैठकीला शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली आहे.