
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
माधव गोटमवाड
नांदेड
नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या किनाळा तालुका बिलोली या गावास गावात जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर नालीचे घाण पाणी साचलेले असल्याने गावात जाण्यासाठी हा मार्ग अनेक दिवसापासून बंद असला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने गावात नागरिक जात असतात परंतु गावातील कोणीही व्यक्ती मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी याच साचलेल्या घाण पाण्यातून ही प्रेत यात्रा न्यावे लागत असल्याने कित्येक वर्षापासून रस्त्यावर साचणारे पाणी प्रशासनाला दिसत नाही का असा सवाल अंत्यविधीस येणाऱ्या नागरिकातून केला जात आहे.
किनाळा येथील बसस्थानकापासून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नालीचे घाण पाणी रस्त्यावर साचून गावात जाणारा रस्ता अनेक वर्षापासून बंद असून नालीचे घाण पाणी रस्त्यावर साचून अनेकांच्या घरात घुसून येथील अनेक नागरिकांना विविध आजारांना बळी पडावे लागले रस्त्यावर सासून घरात येणारे नालीचेघाण पाणी वाहते करावे यासाठी प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही हा प्रश्न अनेक वर्षापासून जशास तसा असल्याने या साचलेल्या घाण पाण्यात बाहेरगावचे गावात येणारे कितेक मोटरसायकलस्वार रस्त्यावर साचलेला गुडघाभर पाण्यात पडून गंभीर जखमी झाले.
बाहेर गाऊन गावात येणाऱ्या नवीन अनोळखी नागरिकांना रस्त्यात साचलेले घाण पाणी माहीत नसल्यामुळे रात्री-अपरात्री या रस्त्यावरून जाताना रस्त्यावर अनेक वर्षांपासून साचलेल्या घाण पाण्यात दगड काचा, व काटेरी काटे असताना गुडघाभर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दिसत नसल्याने काही वाहन चालकांचा पाण्यातील दगडाला मोटरसायकल अडकून अनेक वेळा अपघात झाले. तर याच साचलेल्या घाण पाण्यातुन अनेक वेळा अनेकांची अंत्यविधी ची अंत्ययात्रा वैकुंठरथ किंवा ट्रॅक्टर मधून प्रेत यात्रा नेण्यात येत असली तरी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी गावातील प्रतिष्ठित असलेले तुकाराम पाटील शेळगावे आणि जमनाबि पिरसास यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असताना या दोघांच्याही अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात पाहुणेमंडळी गावात आली असता अंत्यविधीसाठी रस्त्यावर साचलेल्या नांलीच्या घाण पाण्यातून अनेक वर्षापासून अनेकांच्या प्रेतयात्रा न्यावे लागत आहेत याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.
गावातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी हा एकमेव मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून प्रेत यात्रा नेण्यासाठी काहीजण वैकुंठरथ किंवा ट्रॅक्टर मधून ही प्रेती यात्रा या घाण नालीच्या साचलेल्या पाण्यातून नेली जाते मात्र कित्येक वेळा कित्येक नागरिकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने हीच प्रेतयात्रा याच घाण पाण्यातून पायी नेण्यात येते त्यामुळे अनेक वेळा ही प्रेतयात्रा नेत असताना या घाण पाण्यात काटेरी काटे असताना जीव मुठीत धरून या पाण्यातून ही प्रेतयात्रा पुढे नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
रस्त्यावर साचणाऱ्या घाण पाण्याचा निचरा करण्यात यावा गावाला जाणारा मुख्य रस्ता मोकळा करावा दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांची आरोग्य बिघडत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असताना या गंभीर समस्येकडे अद्यापही प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन गावातील नागरिकांची होणारी गैरसोय सोडवावे अशी मागणी गावातील नागरिकांसह बाहेर गावातील नागरिकांतून केला जात आहे.