दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव दिनांक:३०/११/२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा तर्फे जळगाव शहरातील नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या आकारणी नोटिसा देण्यात आल्या व दिल्या जात आहे, तसेच शहरातील अनेक समस्या बाबत महानगरपालिका आयुक्त मा. सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला ताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, रेखाताई कुलकर्णी, वंदना ताई पाटील, मनोज भांडारकर, नगरसेविका गायत्री ताई राणे, सुरेखा ताई तायडे, शक्ती महाजन, दिपक ताई चिरमाडे, आनंद सपकाळे, जयेश भावसार, कुमार श्रीरामे, हेमंत जोशी, अक्षय जेजुरकर, अनिल जोशी, आदिंन सह बूथ प्रमुख, शक्तीकेंद प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी, आघाडी अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, नगरसेवक व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
१)अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी यापूर्वी मालमत्ता कराची आकारणी केली जात नव्हती. परंतु आता नव्याने मालमत्ता कराची (घरपट्टी) ची आकारणी करताना ५०% आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे भविष्यात अपार्टमेंटमध्ये (बिल्डर/नागरिक) पार्किंगसाठी जागा सोडणार नाहीत. त्यासाठी पार्किंगसाठी करण्यात आलेले आकारणी सरसकट रद्द करावी.
२) यापूर्वी तळमजला १००% आकारणी केली जात होती. त्यात बदल केलेला दिसून येत नाही, परंतु पूर्वी संडास सीटसाठी प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे आकारणी केली जात होती, तेही काही काळानंतर शासनाने रद्द केली. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना शौचालयाच्या क्षेत्रफळावर १००% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वी प्रमाणे करण्यात यावी.
३) यापूर्वी तळमजल्यावरील मोकळ्या बाल्कनीला मालमत्ता कराची आकारणी केली जात नव्हती. आता नव्याने आकारणी करताना तळ मजल्यावरील बंद केलेल्या बाल्कनीला १००% मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली आहे, ती रद्द करण्यात यावी.
४) यापूर्वी पहिला मजला ७५% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेले होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना १००% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी.
५) यापूर्वी दुसरा मजला ५०% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ९५% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे आकारणी करण्यात यावी.
६)यापूर्वी तिसरा मजला ५०% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ९०% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्यात यावी.
७) यापूर्वी चौथा मजला २५% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ८०% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे आकारणी करण्यात यावी.
८) बांधकाम अपूर्ण असतानाही आकारणी करण्यात आलेली आहे. जर बांधकाम अपूर्ण असेल तर आकारणी करणे संयुक्तिक नाही. बांधकाम अपूर्ण असल्यास भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास आकारणी करता येत नाही, त्यानुसार अपूर्ण बांधकामाची आकारणी रद्द करण्यात यावी.
सद्यस्थितीत जळगाव शहरात गटारी नाही, स्वच्छता नाही, रस्ते सुस्थितीत नाही, पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना असताना अशा प्रकारे वाढ अवाजवी घरपट्टी आकारणी करून त्यानुसार वाढीव अवाजवी घरपट्टी बिले दिले जातील व त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे, तरी नव्याने मालमत्ता करात करण्यात आलेले आकारणी रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच मालमत्तेची आकारणी लागू करण्यात यावी. तसे न केल्यास नागरिक असुविधांमुळे त्रस्त असताना अशा प्रकारे वाढीव व अवाजवी बिले दिल्या गेल्यास भारतीय जनता पार्टी नागरिकांसाठी शहरातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात तीव्र जनआंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, त्यामुळे जो काही जनआक्रोश होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी व वरील मुद्दे निहाय वाढीव व अवास्तव बेकायदेशीर आकारणी रद्द करण्यात यावी. नागरिकांना वाढीव मालमत्ता कराच्या आकारणी नोटिसा देण्यात आल्या व दिल्या जात आहे, तसेच शहरातील अनेक समस्या बाबत महानगरपालिका आयुक्त मा. सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वला ताई बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, रेखाताई कुलकर्णी, वंदना ताई पाटील, मनोज भांडारकर, नगरसेविका गायत्री ताई राणे, सुरेखा ताई तायडे, शक्ती महाजन, दिपक ताई चिरमाडे, आनंद सपकाळे, जयेश भावसार, कुमार श्रीरामे, हेमंत जोशी, अक्षय जेजुरकर, अनिल जोशी, आदिंन सह बूथ प्रमुख, शक्तीकेंद प्रमुख, जिल्हा कार्यकारिणी, आघाडी अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, नगरसेवक व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात पुढीलप्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
१)अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी यापूर्वी मालमत्ता कराची आकारणी केली जात नव्हती. परंतु आता नव्याने मालमत्ता कराची (घरपट्टी) ची आकारणी करताना ५०% आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढे भविष्यात अपार्टमेंटमध्ये (बिल्डर/नागरिक) पार्किंगसाठी जागा सोडणार नाहीत. त्यासाठी पार्किंगसाठी करण्यात आलेले आकारणी सरसकट रद्द करावी.
२) यापूर्वी तळमजला १००% आकारणी केली जात होती. त्यात बदल केलेला दिसून येत नाही, परंतु पूर्वी संडास सीटसाठी प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे आकारणी केली जात होती, तेही काही काळानंतर शासनाने रद्द केली. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना शौचालयाच्या क्षेत्रफळावर १००% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वी प्रमाणे करण्यात यावी.
३) यापूर्वी तळमजल्यावरील मोकळ्या बाल्कनीला मालमत्ता कराची आकारणी केली जात नव्हती. आता नव्याने आकारणी करताना तळ मजल्यावरील बंद केलेल्या बाल्कनीला १००% मालमत्ता कर आकारणी करण्यात आलेली आहे, ती रद्द करण्यात यावी.
४) यापूर्वी पहिला मजला ७५% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेले होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना १००% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी.
५) यापूर्वी दुसरा मजला ५०% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ९५% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे आकारणी करण्यात यावी.
६)यापूर्वी तिसरा मजला ५०% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ९०% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच आकारणी करण्यात यावी.
७) यापूर्वी चौथा मजला २५% मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली होती. आता नव्याने मालमत्ता कराची आकारणी करताना ८०% आकारणी करण्यात आलेली आहे. ती रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणे आकारणी करण्यात यावी.
८) बांधकाम अपूर्ण असतानाही आकारणी करण्यात आलेली आहे. जर बांधकाम अपूर्ण असेल तर आकारणी करणे संयुक्तिक नाही. बांधकाम अपूर्ण असल्यास भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही. भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास आकारणी करता येत नाही, त्यानुसार अपूर्ण बांधकामाची आकारणी रद्द करण्यात यावी.
सद्यस्थितीत जळगाव शहरात गटारी नाही, स्वच्छता नाही, रस्ते सुस्थितीत नाही, पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना असताना अशा प्रकारे वाढ अवाजवी घरपट्टी आकारणी करून त्यानुसार वाढीव अवाजवी घरपट्टी बिले दिले जातील व त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होण्याची शक्यता आहे, तरी नव्याने मालमत्ता करात करण्यात आलेले आकारणी रद्द करण्यात यावी व पूर्वीप्रमाणेच मालमत्तेची आकारणी लागू करण्यात यावी. तसे न केल्यास नागरिक असुविधांमुळे त्रस्त असताना अशा प्रकारे वाढीव व अवाजवी बिले दिल्या गेल्यास भारतीय जनता पार्टी नागरिकांसाठी शहरातील जनतेसाठी मोठ्या प्रमाणात तीव्र जनआंदोलन करून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, त्यामुळे जो काही जनआक्रोश होईल त्याला प्रशासन जबाबदार असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी व वरील मुद्दे निहाय वाढीव व अवास्तव बेकायदेशीर आकारणी रद्द करण्यात यावी.