
दैनिक चालु वार्ता
रामेश्वर केरे औरंगाबाद
लसीकरण केल्याचे प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन करून लस न घेता काही नागरिक पोबारा होण्याचा फडां लसीकरण शिबिरात दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे
जिल्हाधिकारी यांनी लस घेण्यासाठी कडक बंधने अमलात आणले लसीकरण न केल्यास पेट्रोल, राशन आदी सुविधा मिळणार नाही अशी भुमिका घेतल्याने ठिक ठिकानी होणार्या लसीकरण शिबिरात गर्दी होत आहे मात्र बहुसंख्य लसीकरण शिबिरात आगोदर ऑनलाइन नोंदनी करून लसीकरण करण्यात येत आहे यामुळे काही महाशय ऑनलाइन नोंदनी करत गर्दी चा फायदा घेत पोबारा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे यामुळे ऑनलाइन नोंदनी जास्त होतात मात्र लस उरतात अशी परिस्थीती होत आहे यामुळे लस घेयाचीच नाही मात्र शासनाच्या सुविधाचा फायदा घेयाचा अशी मानसिकता अजून ही काही नागरिकात आहे यामुळे लसीकरण शिबिरात लस न घेता पळ काढणार्याची संख्या कमी असली तरी भविष्यात धोक्याची होऊ शकते यामुळे प्रशासनाने पहीले लसीकरण व नंतरच ऑनलाइन नोंदनी असा उपक्रम राबवणे अशी मागणी जोर धरत आहे
======================================
ऑनलाइन नोंदनी करून लस न घेता पळ काढणार्याची संख्या कमी आहे मात्र असा प्रकार कोणीही करू नये आपण शासनाला नव्हे तर आपण आपलीच फसवणूक करत आहात यामुळे असे कृत्य कोणी करू नये सर्वानी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लासूर स्टेशन च्या सरपंच मिनाताई संजय पांडव यांनी केले आहे