
दैनिक चालू वार्ता
लातूर जिल्हा प्रतिनिधी
प्रा मारुती बुद्रुक पाटील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रा. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. डॉ. पी.डी. चिलगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंदी भाषा की वैश्विकता में जनसंचार माध्यमों का योगदान (विशेष संदर्भ 2000 से 2015 तक) या विषयावर शोधप्रबंध दाखल केला होता. यावेळी बहिस्थ परिक्षक म्हणुन पुणे येथील डॉ. ईश्वर पवार हे होते. तर यावेळी विद्यापीठाचे भाषा संकुलाचे डायरेक्टर डॉ. रमेश ढगे, मार्गदर्शक डॉ. पी.डी. चिलगर यांच्या उपस्थितीत मौखिक परीक्षा झाली. यावेळी स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, प्र.कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिह बिसेन, परीक्षा नियंत्रक डॉ. रवि सरवदे यांच्या हस्ते प्रा. डॉ. बालाजी कारामुंगीकर यांना पीएच.डी. पदवी नोटीफिकेशन प्रदान करण्यात आले.
प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना पीएच.डी. मिळाल्याबद्दल टागोर शिक्षण समितिचे सचिव दलित मित्र, शिक्षण महर्षि डी.बी. लोहारे गुरुजी, डॉ. वसंत बिरादार पाटील, प्राचार्य व्ही. व्ही. गंपले, उपप्राचार्य बालाजी गोडभरले, डॉ. चौधरी सर, डॉ. मारोती कसाब, डॉ. संग्राम गायकवाड, डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतिष ससाणे, प्रा. बब्रूवार मोरे, डॉ. संतोष पाटील, डॉ. इंगळे सर, प्रा. विश्वंभर स्वामी, लसाकम तालुका अध्यक्ष गंगाधर साखरे, माजी अध्यक्ष रमेश भालेराव, भरतकुमार गायकवाड, विज्ञान प्रमुख पुणे रविकुमार, प्रा. सय्यद एम. यू., प्रा. घोरबांड गिरीधर, प्रा. तोंडारे दिनेश, प्रा. ननीर सतिष, प्रा. चिद्रे शिवशंकर, प्रा. सुरेंद्र येलमटे, प्रा. पटवारी अनमोल, प्रा.घटकार एस.टी., प्रा. नंदकुमार क्षिरसागर, प्रा. राहुल देशमुख, युवराज पाटील यासंह मित्रमंडळीने अभिनंदन केले आहे.