
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
मौजे शेकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गेल्या 20 वर्षांपासून कंधार तालुक्यात सामाजिक कार्यात आपली ओळख निर्माण करणारे निवृत्ती जोगपेटे यांची कॉंग्रेस सेवादलाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली.सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केली.
कार्यकर्ता म्हणून कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या अनेक अनुदानित योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना सढळ हाताने मदत करणारा प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा, राजकारण आणि समाजकारण याचा समतोल साधणाऱ्या निवृत्ती जोगपेटे यांची काँग्रेस सेवादलाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.