दैनिक चालु वार्ता
जळगाव शहर प्रतिनिधी
भानुदास पवार
जळगाव- चाळीसगाव येथे चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याबाबत शासकीय महाविद्यालय येथे चिमुकल्या मुलीची विचारपुस करत असतांना महीला ब्रिगेड महीला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सौ. आशाताई अंभोरे, आदिवासी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.मालनताई तडवी, जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस शारदाताई तायडे, संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना परिस्थिती ची माहिती देण्यात आली.केंद्र व राज्य सरकार यांनी अशा निर्दयी नराधमांना फाशीच्या शिक्षेचा कायदा अंमलात आणावा जेणे करून महिला व लहान मुलींवरील वारंवार होत असलेले अन्याय- अत्याचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्याला महिला मुख्यमंत्र्यांची नितांत गरज असुन महिला मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी लहुजी ब्रिगेड महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी केली आहे.