
कोल्हापूर उत्तर विधानसभा चे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा) यांचे निधन
दैनिक चालू वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी ,शहाबाज मुजावर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक फुटबॉलपटू चंद्रकांत जाधव यांचे काल रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पोटात इन्फेक्शन झाल्यामुळे पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती ती अयशस्वी झाली त्यामुळे काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. तसेच कोरोना काळात त्यांना कोरोना सुद्धा झाला होता व ते कोरोना वर ते मात करून आले होते. हैदराबाद मधून दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. चंद्रकांत जाधव हे एक चांगले फुटबॉलपटू असल्यामुळे त्यांचा कोल्हापूर फुटबॉललच्या माध्यमातून थेट कार्यकर्त्यां शी मंडळाची तालमींची संपर्क होता. त्याबरोबरच अल्पावधीत कालावधी मध्ये त्यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना त्या पहिल्या टर्म ला आमदार म्हणून निवडून आले होते सतीश उर्फ बंटी पाटील यांचे ते जवळचे कार्यकर्ते होते राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.