
दैनिक चालु वार्ता , शहादा
प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
शहादा: प्रकाशा लगत ग्राम पंचायत लांबोळा, ता. शहादा येथील गोमाई नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर शहादा महसूल विभागाने कारवाई केली.
सोमवारी लांबोळा ता. शहादा येथील गोमाई नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याचे वृत्त महसूल विभागाला कळाले होते. त्यानुसार शहादा
तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या वाहनांवर कारवाई करीत तहसील कार्यालयात हे वाहन जमा केले आहेत.
या पथकात प्रकाशा मंडळ अधिकारी
मुकेश चव्हाण यांच्या सोबत लांबोळा, डामरखेडा, नांदखेडा येथील तलाठी व मंडळ अधिकारी मोहिदा त श, मंडळ अधिकारी वडाळी यांचा समावेश होता.