दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परांडा- दि . २३ ऑगस्ट २०२३ श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचा 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी ठीक आठ वाजून 45 मिनिटांनी करण्यात आले . यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या सहसचिव मंगल उर्फ शीलाताई साहेबराव देठे या प्रथमच महाविद्यालयात आल्याने त्यांचा बुके देऊन प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सत्कार केला . याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ सुनील जाधव संस्थेच्या सहसचिव सौ मंगल ग्रुप शीलाताई साहेबराव देठे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने यांची उपस्थिती होती . यावेळी वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ गीत सादर करून विद्यापीठ ध्वजास मानवंदना देण्यात आली .
प्राचार्य डॉ सुनिल जाधव यांनी उपस्थित सर्व महाविद्यालयातील कर्मचाऱ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या . शुभेच्छा देताना प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे सुरुवातीचे मराठवाडा विद्यापीठ हे केवळ मराठवाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आले होते .आज या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊन आपले आणि आपल्या या विद्यापीठाचे नाव नावलौकिक करत आहे .विद्यापीठाने विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयास शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत . जसे की लघु संशोधन प्रकल्प विविध अभ्यासक्रम विविध कोर्सेस विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झाल्याबरोबर लगेच स्वतःच्या पायावर उभे राहता येईल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था या विद्यापीठाने निर्माण केलेली आहे . त्यामुळेच आज मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आपले शिक्षण पूर्ण होतात वेगवेगळ्या विभागात स्वतःच अस्तित्व निर्माण करतात .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले तर प्रा डॉ कृष्णा परभने यांनी आभार मानले…