
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
पेठवडज :- जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी पेठवडज गावातील सर्व पाहणी करून गावकऱ्यांना व प्रशासन, ग्रामपंचायत सदस्यांना सूचना देण्यात आल्या आणि ते म्हणाले गावातील घाण पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे आणि ते पाणी साचून राहील्याने. डासांची उत्पत्ती वाढते व हत्ती रोग , अन्य संसर्गजन्य होतात. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांनी गावकऱ्यांना सांगितले की प्रत्येक घरापुढे शोषखड्डे मनरेगा मार्फत केले जातील. तसेच इंजिनिअर मार्फत आराखडा तयार करून ज्या ठिकाणी खडक आहे पाणी मुरत नाही त्याठिकाणी नालीवर चेंबर बसवले जाईल. नदीचे खोलीकरण करून देण्यात येईल. गावातील पाणी गावातच मुरेल याची काळजी गावकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन केले .