
दैनिक चालू वार्ता
माकणी प्रतिनिधी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
माकणी: लोहारा तालुक्यातील माकणी येथे दिनांक 01/12/2021 रोजी बी. एस. एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे डॉ. एस. आर. बिरादार यांनी एड्सचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका उपस्थित स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मुंडे एस. इ. यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. रेडे यांनी निर्मूलनासाठी सामाजिक जागृती करण्यासाठी एन एस एस स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी असे आव्हान करून अध्यक्षीय समारोप केले. तर प्राध्यापिका डॉ. चोचंडे आर. यू. यांनी कार्यक्रमात उपस्थितांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.