
दै.चालु वार्ता
सिल्लोड: प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड: तालुक्यातील रेलगांव येथे गुरुपुष्यामृत पावनपर्वा निमित्त कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुपुष्यामृत पावनपर्वा निमीत्त रेलगांव ता. सिल्लोड येथील ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार रोजी कालीपुत्र कालिचरण महाराज यांच्या व्याख्यानाचे व दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कालीचरण महाराज यांच्या व प्रमुख संतमहंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. आयोजक ग्रामस्थांच्या वतीने महाराज त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थीत भाविकांना सनातन हिंदु धर्म, हिंदु संस्कृती, हिंदु धर्माचे कार्यासह आदि विषयांवर महाराजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित भाविकांनी दर्शन दर्शन घेतले. यावेळी मुर्डेश्वर पिठाचे ओमकारजी महाराज, अरुण महाराज पिंपळे, वैजीनाथ महाराज सह आदिंची या वेळी उपस्थिती होती. या वेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.