
दै.चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
या मोहिमेदरम्यान कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या मात्रेच्या व्याप्तीमध्ये 11.7% लक्षणीय वाढ ( 30 नोव्हेंबर पर्यंत)
सरकारी किंवा खाजगी या दोन्हींपैकी कोणत्याही लसीकरण केंद्रात लस मुदतबाह्य होता कामा नये, उपलब्ध लसींचा वापर वेळेवर करावा
लसींचा अपव्यय शून्यावर आणण्याची राज्यांना सूचना
‘हर घर दस्तक’ या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमुळे, कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची पहिली मात्रा देण्याच्या व्याप्तीत (३० नोव्हेंबरपर्यंत) 5.9 % वाढ झाली आहे.आणि या मोहिमेदरम्यान दुसरी मात्रा देण्याच्या व्याप्तीमध्ये 11.7% इतकी लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव श्री राजेश भूषण यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून (व्हीसी ) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत “हर घर दस्तक” मोहिमेअंतर्गत राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील स्थिती आणि प्रगतीचा आढावा घेतला.