
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी-राम कराळे
प.पु. सद्गुरु शंकर भारती महाराज यांचा २० वा संजीवनी समाधी उत्सव सोहळा मौजे आंनतेश्वर ता लोहा येथे दिनांक 02/12/2021 रोजी संपन्न झाला.श्री.ह. भ. प. पंकज महाराज देशमुख सेनगांवकर या महाराजांचे कीर्तन झाले. त्यावेळी ज्यांच्या आवाजाने संबंध महाराष्ट्र ला वेड लावणारे संगीत विशारद कैलास महाराज फरकंडेकर व त्यांचा संच उपस्थित होता.कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भक्त मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.प.पु. सद्गुरु शंकर भारती महाराज यांच्या संजीवनी समाधी उत्सव निमित्त तेलंगणा ,आंध्रप्रदेश,कर्नाटक येथील भक्त मंडळी उपस्थित होते.