
दैनिक चालू वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
शहादा तालुक्यातील जयनगर, कहाटूळ, बोराळे, वडाळी, टेंभा, फेस, कळंबु ह्या सात गावात एकाच रात्री खेळ रचून लुटला लाखोंचा डल्ला, चोरट्यांनी घरे, मंदिर, दुकाने लुटल्याचे कळले. अशी माहिती मिळताच शहादा पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन शहानिशा केली.
कहाटूळ येथे एका घरात तर तीन दुकानात चोरी, फेस येथे दोन घरात चोरी, वडाळी येथे एक घर, बोराळे येथे एक घर, टेंभा तसा येथे एक घर, कळंबु येथे तीन घरे, आणि जयनगर येथील प्रख्यात असलेले गणेश मंदिराच्या दोन ते चारच्या दरम्यान पावसाचा फायदा घेत दरवाज्याचं कुलूप तोडून मद्ये घुसले मात्र त्यांना खाली हात मंदिरातून जावे लागले असे तेथील नागरिकांनी सांगितले. काही चोरींची तक्रार ही नोंदवली गेली परंतु काही चोरिंची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आले.
पोलिस प्रशासन हे दिवसभर सुरागाच्या शोधात डॉग स्कॉट घेऊन प्रयत्न करत होते. तर काही सीसीटिव्ही फुटेज हाती लागल्याचे कळाले ते बघून चोरांचा तपास लावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गावे असलोड तर काही गावे सारंगखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत येतात.