दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल
(सुनिल पाटिल)
म्हसावद : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते त्यानुसार ६ डिसेंबर २०२१ जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळून तक्रार अर्ज सोमवार ६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे उपस्थीत राहून सादर करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे