दैनिक चालु वार्ता
शहादा ग्रामीण
(पुनम पवार)
शहादा तालुक्यातील पुसनद येथे खरेदी केलेल्या नवीन घराचा नमुना ८अ चा उतारा मिलनाच्या मागणीसाठी २ हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या मुलाचे नवे ग्रामपंचायत पुसनद हद्दीत खरेदी केलेल्या नवीन घराचा नमुना ८अ चा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार यांच्या कडे आरोपी लोकसेवक ग्रामसेवक आरोपी उमेश निमसिंग रौंदळे रा.प्लॉट न.११,विनोद नगर,देवपूर,धुळे जि. धुळे याने २ हजार रुपये लाचेची मागणी केली .तक्रारदाराने या बाबत पैसे देताना ती रक्कम स्वीकारतांना ग्रामसेवक उमेश निमसिंग रौंदळे याला शहादा खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयाच्या समोर मोकळ्या जागेत लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले .सदरची कामगिरी पोलीस श्रीमती माधवी समाधान वाघ, समाधान महादू वाघ, पोहवा उत्तम महाजन ,पोहवा विजय ठाकरे, पोहवा विलास पाटील,पोना अमोल मराठे,पोना चित्ते, पोना देवराम गावित, मापोना ज्योती पाटील, पोना नावडेकर, चापोना महाले अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार पथकाने केली आहे