दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते वैजापूर शहरातील नगरविकास खात्याने व आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय बांधकाम भुमीपुजन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभिकरण, रामराव पाटील नाट्यगृह व देवी दाक्षायणी प्रवेशद्वार या कामांचे भुमीपुजन व लोकार्पण करण्यात आले. वैजापूर येथील धुमाळ मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात सामंत यांनी मागील २८ वर्षांपासुन रेंगाळत असलेला वैजापुरच्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी लावु असे आश्वासन दिले. अजित पवार पंतप्रधान मोदी यांच्या कामांनी प्रभावित होऊन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गतिमान कार्यपद्धतीमुळे सरकारमध्ये सामील झाले असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व आमदारांनी आदर्श घ्यावा असे काम वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे करीत आहेत. आम्ही राजकिय संस्कृती पाळतो, संयम पाळतो वैयक्तिक टिका कुणावरही करत नाही असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, कल्याण दांगोडे, साबेर खान,रामहरी जाधव, राजेंद्र साळुंके, पारस घाटे, दिनेश राजपूत, सुलभा भोपळे, दशरथ बनकर,गणेश इंगळे, पद्माताई साळुंके,साहेबराव औताडे, अंकुश हिंगे, संजय बोरनारे, शैलेश चव्हाण, स्वप्निल जेजुरकर, इम्रान कुरेशी, सुप्रिया व्यवहारे, मुमताज सौदागर, प्रिती भोपळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, ज्ञानेश्वर टेके, गुलाबराव पाटील, वसंत साळुंके, आण्णासाहेब शेळके, प्रमोद कुलकर्णी, अमोल बोरनारे, महेश बुनगे यांच्यासह उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनिल सावंत, मुख्याधिकारी भागवत बिघोत उपस्थित होते.शेतकर्यांनी न्यायालयात वाढीव आर्थिक मोबदला मिळावा, या मागणीसाठी स्वतंत्र पाठपुरावा करणाऱ्या शेतक-यांना वेगवेगळ्या प्रकरणात कमी अधिक मोबदला देन्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
मंत्री सावंत यांनी विशेषबाब म्हणून एकरी १५ लाख, व्यक्सायासाठी एक हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड, कुहुंबतील एका सदस्याला नोकरी, लोणी बुद्रुक गावातील सर्व अंतर्गत रस्ते व पिण्याची पाणीपुरवठा योजनेचे कामे एमआयडीसीकडून केली जातील अशी ग्वाही सामंत यांनी दिली.