दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड – युवा मिल्ट्री अकॅडमी काकांडी येथील अग्निवीर सैन्य भरतीमध्ये संभाजीनगर व नागपूर येथे ए.आर.ओ.मध्ये निवड झालेल्या ५९ जवानांचा सत्कार समारंभ व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी माजी सनदी अधिकारी अनिलजी मोरे ,भारतीय सैन्यातील रिटायर्ड ऑफिसर कॅप्टन श्री किशन कपाळे , कॅप्टन श्री प्रकाश कस्तुरे , कॅप्टन श्री विठ्ठल कदम , कॅप्टन श्री रामराव थडके , मंडळ अधिकारी हयून पठाण,
से.नि.तहसीलदार झगडे यांनी आपल्या कर्तव्य काळातील घटना सांगून प्रोत्साहन दिले माजी सनदी अधिकारी अनिलजी मोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक हाम्पले सर संचालक प्रा.परमेश्वर घागरदरे अध्यक्ष संतोष पाटील आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे व कार्यरत सैनिक, पोलीस अधिकारी,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार सत्कार समारंभास उपस्थित होते.