दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड,/धर्माबाद :- धर्माबाद येथील राजस्थानी नवयुवक संघाच्यावतीने स्व. रामप्रसादजी मालू यांच्या प्रथम पुण्यतिथीनिम्मित निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड येथील जीवन ज्योती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यावेळी दीडशेच्यावर लोकांची तपासणी करून त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या केल्या.
या शिबिराच्या सुरुवातीला स्व. रामप्रसादजी मालू यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे अभिवादन करण्यात आले. यानंतर आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. आरोग्य तपासणीसाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. इसिजी, बीपी, शुगर यासह वेगवेगळ्या तपासण्या व
चाचण्या यावेळी करण्यात आल्या. स्व. रामप्रसादजी हे नांदेडचे प्रसिद्ध डॉ. बी. आर. मालू यांचे वडील असून त्यांनी शिविरात अनेक जणांच्या तपासणी केल्या.
वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने डॉ मालू यांनी हे आरोग्य शिबीर घेण्यासाठी पुढाकार घेतला होता. धर्माबादच्या माहेश्वरी भवन येथे हे शिबिर ठेवण्यात आले होते. या शिबिरामध्ये जीवन ज्योती हॉस्पिटलचे डॉ संदेश मालू, डॉ दिव्या मालू, डॉ उर्मिला मालू डॉ साक्षी मालू, डॉ महेश मालू ,यांनी जवळपास दीडशेच्यावर जणांची तपासणी करून औषधोपचार लिहून दिले.