दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि.२८) होणार आहे.या कालावधीत गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून ईद ए मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार दि.२८ ऐवजी शुक्रवार दि.२९ रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाल्याचे आदेश सामान्य प्रशासनाकडून निर्गमित झाले आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात.दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून दि.२८ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालय नियमित सुरु राहतील.