दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी स्वरूप गिरमकर
(पुणे) वाघोली : शिरूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तुषार दसगुडे यांची निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र नुकतेच देण्यात आले.
राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनुभव व कार्यकर्त्यांचे संघटन याची पार्श्वभूमी पाहून पुणे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार,राष्ट्रवादी युवक पुणे जिल्हा अध्यक्ष स्वप्निल भैय्या गायकवाड तसेच सहकार राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यांनी तुषार दसगुडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे,अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करण्यासाठी कार्य करणार असल्याचे तुषार गायकवाड यांनी यावेळी सांगितले.