
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : बुधवारी हे दोघेही पहिल्यांदाच ‘तडप’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये मीडियासमोर एकत्र दिसले होते. अथिया आणि केएल राहुलला स्टेजवर एकत्र बघून त्यांचे फोटो काढण्याची चढाओढ सुरु होती.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांच्यातील सिक्रेट अफेअर आता संपूर्ण जगासमोर आले आहे.या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या नात्यावर बरेच दिवस मौन पाळले होते, पण आता केएल राहुलचे अथियावरील प्रेम जगासमोर आले आहे.
केएल राहुलचा हात धरत अथिया स्टेजवर पोहोचली आणि पापाराझींना हसत हसत पोझ दिली. यादरम्यान, दोन्ही सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. जणू काही त्यांना कायमचा एकमेकांचा हात धरायचा होता. अथियाचे वडील सुनील शेट्टी आणि आई माना शेट्टी यांनीही प्रीमियरला हजेरी लावली होती. अथियाचे संपूर्ण कुटुंब केएल राहुलसोबत फोटो काढताना दिसलं. अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या चित्रपटाच्या प्रीमियरला केएल राहुलची उपस्थिती हीच एक मोठी गोष्ट आहे.
अलीकडेच 5 नोव्हेंबरला अथियाच्या वाढदिवसा दिवशी केएल राहुलने त्यांच्या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले होते. त्याने अथियासोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आणि हार्ट इमोजीसह लिहिले, ‘Happy Birthday Merry @athiyashetty.’ त्यांच्या या पोस्टने सर्व अटकळांना पूर्णविराम दिला होता. केएल राहुलच्या या पोस्टवर लोकांनी अथियाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आणि कपललाही शुभेच्छाही दिल्या.
अथिया आणि केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अथिया केएल राहुलसोबतही दिसली होती. बीसीसीआयला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये केएल राहुलने अथियाला आपला जोडीदार असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी सुनील शेट्टी यांना दोघांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा, त्यांनी उत्तर तर दिले नाहीच पण नकारही दिला नाही आणि आता केएल राहुल आणि अथियाचे नाते उघडल्यानंतर, सुनीलने मुलीच्या नात्याला आक्षेप घेतला नाही, फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहेत.